धनगर आरक्षणासाठी राष्ट्रवादी, बहुजन वंचित आघाडी आणि भाजपचे मेळावे

नांदेड जिल्ह्य़ातील माळेगावची यात्रा खरे तर प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध. पण या वेळी माळेगावच्या यात्रेत ‘आरक्षणाची जत्रा’ भरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न नवे वळण घेण्याची शक्यता आहे. या दोन कार्यक्रमांबरोबरच बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरही धनगर आरक्षणाची मागणी लावून धरणार आहेत. मराठा मोर्चानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘जत्रेतले आरक्षण’ असा नवेच राजकीय सूत्र विकसित होताना दिसत आहे. ६ जानेवारी रोजी हे कार्यक्रम होणार आहेत.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

विशेष म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी आणि थोडय़ाशा अंतरावर होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमासाठी युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर यांनी पुढाकार घेतला आहे. भाजप सरकार आल्यानंतर पहिले तीन वष्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेला येत. भंडारा हातात घेऊन सांगतोय, आरक्षण मिळेल! असे ते म्हणत. मात्र, आता ते यात्रेला येत नाहीत. त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी ‘ललकार’ मेळावा घेत आहोत, असे सलगर यांनी सांगितले. या मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदींची उपस्थिती असणार आहे.

बहुजन वंचित आघाडीचे नेतेही याच यात्रेत धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सभा घेत आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण दिल्यानंतर सरकारने मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून दिल्याचे अ‍ॅड. आंबेडकर सांगत आहेत. धनगर हा समाज बहुजनांमधील वंचितत्वाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने तो बरोबर असावा, अशी मांडणी त्यांच्याकडून केली जात आहे. त्याचाच एक भाग मानून हा मेळावा माळेगाव येथे होणार आहे.

धनगर आरक्षणाच्या मागणीचा राजकीय लाभ उचलण्यासाठी सुरू असणारा खेळ एका बाजूला आणि दुसरीकडे या अनुषंगाने सुरू असणारे सरकारचे प्रयत्न समाजाच्या समोर यावेत म्हणून भाजपच्या वतीनेही कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी सांगितले. या मेळाव्यास पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे सुप्रियाताई आणि पंकजा मुंडे या दोन महिला नेत्यांचे मेळावे एकाच यात्रेत पहिल्यांदाच होत आहेत.

खरे तर या यात्रेत घोडय़ांचा मोठा बाजार भरतो. अगदी पाच लाखांपासून अधिक किमतीचे घोडे येथे विक्रीसाठी येतात. तसेच उंट आणि गाढवाचाही बाजार भरतो. मराठवाडय़ातील ही यात्रा अनेक अर्थाने नेहमीच चर्चेत राहिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कुलदैवत असल्याने येथे अनेक सोयी निर्माण झाल्या. त्यानंतर विलासराव व भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे घोडेही या यात्रेत आणले जात. ते घोडे पाहण्यासाठीही मोठी गर्दी होत असे. या वर्षी मात्र वेगळ्याच कारणाने ही यात्रा गाजण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे, महादेव जानकर हे दोन मंत्री माळेगाव यात्रेतील कार्यक्रमास येणार असल्याने बीडमधून त्यांचे समर्थकही या वेळी गर्दी करतील. तसेच त्यांच्या गर्दीपेक्षा आपली गर्दी अधिक जास्त होती, असे दाखविण्यासाठी सारी तयारी सुरू झाली आहे. बारामती मतदारसंघातील धनगर समाजाची संख्या, न मिळालेले आरक्षण या पार्श्वभूमीवर माळेगावाची यात्रा या वर्षी अधिक गर्दीची असण्याची शक्यता आहे.

Story img Loader