Maharashtra Assembly Special Session on Maratha Reservation: ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आज कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी आपल्याला सर्वानींच सहकार्य केलं. मी जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता केल्याचं समाधान मला आहे असं मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी आंदोलनकर्त्यांना भेटलो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सगळ्या मंत्र्यांचं जे सहकार्य लाभलं त्यामुळेच आपण हा निर्णय घेत आहोत. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्र विधानमंडळ या वास्तूत अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहेत. आजही ही वास्तू त्या उज्ज्वल परंपरेचा भाग होते आहे. ना कुणावर अन्याय असा निर्णय हा आपण घेतो आहे. मुख्यमंत्री असूनही मी आंदोलनकर्त्यांना भेटावं लागलं. मी मुख्यमंत्री आहे म्हणून प्रोटोकॉल म्हणून मी त्यांना भेटणार नाही असं मी केलेलं नाही. मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीची आठवण करत आंदोलनकर्त्यांना भेटलो. माझ्या पदाचा आब वगैरे काही मी मानला नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मी शब्द पूर्ण करुन दाखवला आहे

काही लोक म्हणाले एकनाथ शिंदेंनी वेळ मारुन नेली, काही जण म्हणाले की एकनाथ शिंदे शब्द पूर्ण करणार नाहीत. पण आम्ही शेतकरी हिताचे, कष्टकरी जनतेचे आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले आहे. कुणालाही शब्द देताना आम्ही आश्वासन पूर्ण करता येईल असेच शब्द आम्ही देतो. माझ्यावर लोकांवर अनेक विश्वास ठेवतात कारण मी दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर लोक विश्वास ठेवतात. एकदा शब्द दिला की मागे हटत नाही. मला राजकीय बोलायचं नाही. हा जो निर्णय आहे तो मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काही अनुचित प्रकार आंदोलनांच्या दरम्यान घडले पण ते घडायला नको होते असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आजचा दिवस निवडला.

हे पण वाचा- Maratha Reservation Special Session: “तुम्ही सगेसोयऱ्याचा विषय अधिवेशनात घेतला नाही तर मी उद्या…”, मनोज जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा!

१५० दिवस आम्ही मेहनत केली

आम्ही १५० दिवस मेहनत आजच्या दिवसासाठी होती. तीन लाख लोक काम करत होते. सगळ्यांचं एकच उद्दीष्ट होतं की दिवसरात्र काम करुन आपल्याला मराठा आरक्षण देण्यासाठी अहोरात्र झटले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारदेखील हेच सांगत होते की मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हाच पर्याय होता असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे हीच भावना आपली सगळ्यांची आहे.

चर्चेतून योग्य मार्ग निघाला पाहिजे आणि राज्यातल्या सर्व समाज बांधवांनाही मी हेच आवाहन करतो. प्रत्येक घटकाला मी हेच आवाहन करतो. असंही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reservation for maratha community without doing injustice to obc community said cm eknath shinde scj