शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणामुळे आरक्षणाचा मुद्दा बाजूला जाऊ शकतो असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले. कंत्राटी भरती वरून जयंत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रसार माध्यमाशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, राज्य सरकार कंत्राटी नोकरांनी चालवण्याचा सत्ताधारी सरकारची मानसिकता दिसत आहे. राज्यात बेकारीचं प्रश्न मोठा आहे. कंत्राटी कर्माचारी किती जबाबदारीने काम करतील हा प्रश्न आहे. कंत्राटी नोकर भरतीमुळे आरक्षणाचा प्रश्न बाजूला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कोल्हापुरातील पुण्यपर्व गृहनिर्माण संस्थेच्या २३ देखभाल शुल्क थकबाकीदारांविरोधात जप्तीचे आदेश

कंत्राटी भरतीसाठी सरकारकडून ९ एजन्सी नियुक्त केल्या आहेत. राज्यात नोकरभरती, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई,आरक्षण असे वेगवेगळे मुद्दे असताना जाणीवपूर्वक वेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील जर मोदी, नवीन युनो तयार करू,असं म्हणत असतील तर त्यांचा विश्वास खरा ठरो.पण युनो करण्याचा कालावधी ठरला पाहिजे, लोकसभा निवडणुकीआधी केल्यास बरं होईल असा उपरोधक टोला त्यांनी लगावला. मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील मजकूर आपण सोशल मीडियातून पाहिलं. त्यांच्या मागे सूत्रधार कोण आहे, आपणाला माहिती नाही असेही ते म्हणाले. मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेदरम्यान आसपासच्या गावात वीज आणि इंटरनेट खंडित होण्याचा प्रकार राज्य सरकारचा निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reservation issue can be sidelined due to contract job in government says jayant patil zws
Show comments