पोलिओविरोधात जनजागृतीसाठी सुमारे पाच हजार स्पर्धकांच्या सहभागाने येथे रंगलेल्या पाचव्या अंबड रोटरी सपकाळ नॉलेज हब धावण्याच्या स्पर्धेत दत्ता बोरसे व ‘गोल्डन गर्ल’ अंजना ठमकेने बाजी मारली.
खुल्या गटात दत्ता बोरसे (प्रथम), सुरेश वाघ (व्दितीय) आणि कांतिलाल कुंभार (तृतीय) यांनी यश मिळविले. मुलींच्या १७ वर्षांआतील गटात अंजना ठमके (प्रथम), प्रियंका ठाकूर (द्वितीय) व अंजली थेटे (तृतीय) आले. मुलांमध्ये या गटात किसान तडवी, हिरामण पिल्लाई, प्रभू परदेशी यांनी यश मिळविले. मुलींच्या १४ वर्षांखालील गटात दुर्गा देवरे, सायली मेंगे आणि लक्ष्मी दिवे तर, मुलांमध्ये दिनेश वसावे, नामदेव खाडे, नितीन गावित यांनी यश मिळविले.
विजेत्यांना प्रमुख पाहुणे विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव, सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, मोनिका आथरे आणि अ‍ॅथलीट प्रशिक्षक विजेंद्र सिंग, रोटरी अंबडचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या हस्ते रोख पारितोषिके देण्यात आली. १० हजार रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय सात हजार तर तृतीय पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण ६० हजार रुपयांची बक्षिसे, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. के. झरेकर यांनी केले. आभार सुनील देशपांडे यांनी मानले. स्पर्धेकरिता मॅग्नम हार्ट इन्स्टिटय़ूट आणि तुलसी आय हॉस्पिटलतर्फे दोन रुग्णवाहिका सेवेसाठी ठेवण्यात आल्या होत्या. रोटरीची स्पर्धा आणि जनजागृती आता नवनवीन विक्रम करीत आहे. तसेच खेळाडूंना आर्थिक पाठबळ आणि चांगली संधी देण्याचे काम करीत असल्याचे मत सपकाळ नॉलेज हबचे रवींद्र सपकाळ यांनी मांडले. स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक सपकाळ नॉलेज हब हे होते.

Story img Loader