सावंतवाडी : मालवण- राजकोट येथे पहिल्या पुतळयापेक्षा दुप्पट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा लवकरच उभारण्यात येणार आहे. याची जबाबदारी जागतिक शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आली आहे, तर परिसरात शंभर कोटी खर्च करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आज वेर्ले येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
हेही वाचा – शरद पवार नगर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल, नायगाव बीडीडी चाळीचे नाव बदलले
हेही वाचा – चार जिल्ह्यांत सुरू होणार फिरते पक्षाघात केंद्र
तसेच सैनिकांच्या मुलांना सैन्यात भरती होणे शक्य व्हावे यासाठी शालेय अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून त्या माध्यमातून थेट एनडीएमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. लवकरच या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. केसरकर यांनी आज वेर्ले येथे माजी सैनिकांची भेट घेतली. यावेळी सैनिकांशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली.