प्रदीप नणंदकर

लातूर : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यावर भाजपचे राजकीय गणित बदलत असून त्याचे परिणाम लातूर जिल्ह्यात दिसत आहेत. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील व उदगीरचे आमदार संजय बनसोडे या दोघांनी अजित पवार यांना साथ दिल्याने दोन्ही ठिकाणी भाजपअंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली.  जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे अहमदपूरचे माजी आमदार विनायकराव पाटील अस्वस्थ आहेत. यापूर्वी विनायकराव पाटील अपक्ष निवडून होते.त्यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपामधील इच्छुक मंडळी नाराज झाली.

buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party
एकनाथ शिंदेंचा शरद पवार व काँग्रेसला दणका, नाशिकमधील मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
Gulabrao Deokar , BJP, Ajit Pawar group, Ajit Pawar ,
गुलाबराव देवकर यांची पाऊले आता भाजपकडे, अजित पवार गटात पक्षप्रवेशास विरोध
Chandrapur, two-wheelers children fine,
चंद्रपूर : अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास पालकांनाच होणार दंड
408 people committed suicide in Dhule district during 2024
धुळे जिल्ह्यात वर्षभरात ४०८ जणांची आत्महत्या; पुरुषांची संख्या सर्वाधिक
Mahagaon couples married , couples married retired ,
एका लग्नाची दुसरी गोष्ट! निवृत्तीच्या वयात १४ जोडपी अडकली विवाहबंधनात

पक्ष श्रेष्ठींकडे विनायकराव पाटील सोडून कोणालाही विधानसभेची उमेदवारी द्या सर्वजण आम्ही एकमुखी त्यांच्या पाठीशी राहू असे सांगितले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी विनायकराव पाटील यांना तिकीट दिले त्यानंतर अहमदपूरमधील दिलीपराव देशमुख व आयोध्या केंद्रे या दोघांनी बंडखोरी केली. परिणामी विनायकराव पाटील यांचा पराभव झाला व राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील आमदार झाले. त्यानंतर पक्ष एकजूट ठेवायचा म्हणून आयोध्या केंद्रे व दिलीपराव देशमुख या दोघांनाही पुन्हा भाजपत प्रवेश देण्यात आला. दिलीपराव देशमुख यांना तर भाजपने ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष केले आहे. आमदार बाबासाहेब पाटील हे अजितदादासोबत आल्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी नक्की मानली जाते. त्यामुळे अस्वस्थांच्या यादीत माजी आमदार विनायकराव पाटील हे अग्रेसर. त्यामुळे पुढील निवडणुकीत कोणता पक्ष निवडायचा या विचार ते करत आहेत.

माजी मंत्री व निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी १९ तारखेपासून जिल्ह्यात जलजागर यात्रा सुरू केली आहे. मराठवाडय़ाला हक्काचे पाणी मिळावे व प्रत्येक जिल्ह्याला वेगळा वाटा मिळावा ही भूमिका घेऊन ते सर्व तालुक्यांत यात्रा काढत आहेत. त्या यात्रेला पाठिंबा मिळतो आहे .उदगीर तालुक्यातील नळगीर येथे माजी मंत्री व अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी जलयात्रेला पाठिंबा दिला. संभाजीराव निलंगेकर हे महत्त्वाचे काम करत असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. बाळासाहेब जाधव निलंगेकरांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर अहमदपूरमध्ये विनायकराव पाटील मित्र मंडळात अस्वस्थता अधिक वाढली. यात्रा हाडोळती या गावी आल्यानंतर यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणताही राजकीय विषय चर्चेला जाऊ नये, म्हणून या यात्रेला विरोध असल्याचे निदर्शकाचे म्हणणे होते.  संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपली ही यात्रा राजकीय नाही, पाण्याच्या प्रश्नासाठी आहे या यात्रेत कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नाही. पांढरा झेंडा हा शांतीचे प्रतीक तर निळा झेंडा हा पाण्याचे प्रतीक आहे असे सांगत आपला पाठिंबा मराठा आरक्षणाला आहे, मात्र यासाठी लोकांनी राजकारण करू नये असे म्हटले. जलयात्रेचे निमित्त करत विनायकराव पाटील गटाने आपली अस्वस्थता जाहीरपणे व्यक्त केली आहे.

Story img Loader