गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील तहसीलदारांच्या वाहनांना इंधन अनुदान उपलब्ध झालेले नाही. इंधन अनुदानाअभावी वाहने चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील तहसीलदारांनी आजपासून शासकीय वाहनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील तहसीलदारांच्या वाहनांना राज्य सरकारकडून मिळणारे इंधन अनुदान वेळेवर उपलब्ध होत नाही. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने दखल घेतलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून तहसीलदारांच्या वाहनांना इंधन अनुदान मिळालेले नाही. संपूर्ण राज्यात सुमारे ८ ते ९ कोटींचे इंधन अनुदान थकले आहे. तर रायगड जिल्ह्य़ात तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या गाडय़ांचे एक कोटीचे इंधन अनुदान थकले आहे.
इंधन अनुदान थकल्याने आता उधारीवर वाहने चालवणे कठीण झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघनटनेने म्हटले आहे. हे अनुदान तातडीने मिळावे अन्यथा सरकारी वाहने जमा करणार असल्याचे पत्र संघटनेने महसूलमंत्र्यांना गेल्या महिन्याच्या २० तारखेला दिले होते. मात्र तरीही अनुदान उपलब्ध झाले नाही. अखेर आज सर्व तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपली सरकारी वाहने जमा केली.
तहसीलदारांचा शासकीय वाहनांवर बहिष्कार
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील तहसीलदारांच्या वाहनांना इंधन अनुदान उपलब्ध झालेले नाही. इंधन अनुदानाअभावी वाहने चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील तहसीलदारांनी आजपासून शासकीय वाहनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तहसीलदारांच्या वाहनांना राज्य सरकारकडून मिळणारे इंधन अनुदान वेळेवर उपलब्ध होत नाही. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने दखल घेतलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-12-2012 at 06:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenue office boycott on government vehicles