नेवासे पोलिसांनी एक अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. त्याच्यासह इतर दोघांनाही अटक करण्यात आली. या दोघांना दि. १० पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज न्यायालयाने दिला. अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
कैलास वंजारे व लक्ष्मण सहादु अढागळे या दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश झाला. या दोघांनी अल्पवयीन मुलास कट्टा व काडतुसे ४० हजार ४०० रुपयांना विकली होती. या मुलाचे सेंट्रल बँक चौकात विळे, कोयते बनवण्याचे वर्कशॉप आहे. या वर्कशॉपच्या गोदामात त्याने कट्टा दडवला होता.
कैलास हा मध्य प्रदेशातून स्वस्तात कट्टे आणून नेवासे परिसरात विकतो. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. टी. शिंदे करत आहेत. यापूर्वीही नेवाश्यासह तालुक्यातील घोडेगाव, सोनई, पांढरीपूल परिसरातून अनेक गावठी कट्टे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Story img Loader