अलिबाग : मागील ४ ते ५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे भातपिकाची कापणी लांबणीवर पडणार आहे. साधारण दसऱ्यानंतर कोकणात भातपिकाच्या कापणीला सुरुवात होते. सध्या हळव्या भातपिकामध्ये दाणे भरले असून ही पिके कापणीच्या अवस्थेत आहेत. मात्र पावसामुळे आता कापणी लांबणीवर पडणार आहे. काही ठिकाणी भातशेती आडवी झाल्याने रायगडमधील शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या हळव्या भातपिकांमध्ये दाणे भरले असून भातपीक कापणीच्या अवस्थेत आहे. साधारण दसऱ्यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते. पुढील दोन दिवसांत कापणीचा हंगाम सुरू होईल. असे असताना आज पहाटेपासूनच जिल्ह्याच्या सर्वच भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतो आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in