सांगली : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी परिवहन विभागाचे सर्व नियम मोडीत काढत शनिवारी मिरज शहरात प्रवासी रिक्षाचे सारथ्य करीत आश्‍चर्याचा धक्का दिला. पालकमंत्र्यांच्या रिक्षा सारथ्यामुळे सुरक्षा रक्षकांबरोबरच कार्यकर्त्यांचीही धावपळ झाली. मिरज शहरातील पंढरपूर रस्त्यावरील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयासमोर बसवेश्‍वर महाराजांचा महापालिकेने पुतळा बसविला आहे. या  पुतळ्याला अभिवादन करण्याचा पालकमंत्री डॉ. खाडे यांचा शनिवारी नियोजित कार्यक्रम होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 शासकीय वाहनामधून जनसंपर्क कार्यालयापासून मिरज शहरातील  कर्मवीर चौकामध्ये आल्यानंतर पालकमंत्र्यांनी वाहनातून उतरून रिक्षाचे सारथ्य करण्यास प्रारंभ केला. या दरम्यान, त्यांचे सुरक्षा रक्षक, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस पथकाची चांगलीच धावपळ उडाली. रिक्षामध्ये मागे प्रवाशी आसनावरही  काही  कार्यकर्ते बसले होते. तर सुरक्षा रक्षक रिक्षासोबत दोन्ही बाजूला लोंबकळत धावत होते ही सर्कस सुमारे दोनशे मीटर सुरू होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw driver suresh khade transportation department breaking rules rickshaw ysh
Show comments