Riots During Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांनी रंगत चढत जात आहे. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे त्यादिवशीच कोणाविरोधात कोण लढणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव असल्याचा मोठा दावा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “नाशिक, संभाजीनगर येथे झालेल्या दोन दंगलींचा आढावा घेतला तरी कळेल की या दंगली सुनियोजित होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही असा प्रकार केला जाणार आहे अशी माहिती आहे. ही निवडणूक सहजासहजीने जिंकू नये असा त्यामागचा डाव आहे.”
हेही वाचा >> वैजापूर, गंगापूर येथे धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून टायर जाळून रास्ता रोको, जोरदार निदर्शने
संजय शिरसाट तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात
छ
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) संजय शिरसाट हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पण एकंदरितच बदललेली राजकीय समीकरणं बघता छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निर्मिती ही २००९ च्या फेररचनेनुसार झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघातून संजय शिरसाट यांना रिंगणात उतरवले. तेव्हापासून आजपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दंगल उसळली होती. तसंच, ऑगस्टमध्येही एका व्हायरल व्हिडिओमुळेही तणाव निर्माण झाला होता. एका धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या धर्मातील धर्मगुरुबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ एका गटाकडून गंगापूर, वैजापूर, खंडाळा येथे टायर जाळून जोरदार निदर्शने करण्यात आली. यामुळे तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.
ग
ध