नांदेडमध्ये लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नऊजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने वऱ्हाडी असलेल्या मिनी बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की अपघातात नऊ जण जागीच ठार झाले. तर अन्य १६ जण जखमी असून त्यामधील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. नांदेड विद्यापीठासमोर हा भीषण अपघात झाला.
हे सर्व वऱ्हाडी नांदेडच्या सहारे कुटुंबातील होते. बारडहून निघालेली लग्नाची मिनी बस कर्नाटकातील गुलबर्ग्याला जात होती. मात्र शहरालगतच विद्यापीठासमोर ट्रकने मिनी बसला धडक दिली.
नांदेडमध्ये वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नऊ जणांचा जागीच मृत्यू
नांदेडमध्ये लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नऊजणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
First published on: 06-06-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident in nanded