नांदेडमध्ये लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नऊजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने वऱ्हाडी असलेल्या मिनी बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की अपघातात नऊ जण जागीच ठार झाले. तर अन्य १६ जण जखमी असून त्यामधील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. नांदेड विद्यापीठासमोर हा भीषण अपघात झाला.
हे सर्व वऱ्हाडी नांदेडच्या सहारे कुटुंबातील होते. बारडहून निघालेली लग्नाची मिनी बस कर्नाटकातील गुलबर्ग्याला जात होती. मात्र शहरालगतच विद्यापीठासमोर ट्रकने मिनी बसला धडक दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा