राज्यात नगरपंचायत निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. सर्वच पक्ष निवडणुकांसाठी प्रचार करताना दिसून येत आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभा घेतली. या सभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“माझं आव्हान आहे ३० वर्ष राहिलेल्या आमदाराला, माझ्या धरणगावला या आणि तिथले रस्ते पाहा. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन. महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करा. हा योगायोग आहे की या जळगाव जिल्ह्याचं भाग्य खूप चांगलं राहिलंय. इथला कोणताही आमदार मंत्री झाल्यावर पाण्याचीच खाती मिळाली. एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री झाले,” असं गुलाबराव पाटील सभेत बोलताना म्हणाले.

गुलाबराव पाटील यांनी सभेत बोलताना एकनाथ खडसेंना डिवचलं. राज्याला ज्ञान शिकवण्याआधी किमान रस्ते तरी चांगले करा, असं म्हणत पाटील यांनी खडसेंना सुनावलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. यावर गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. “नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्या एवढी उंची नाही. उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी नितेश राणेंच्या वडिलांना राजकारणात मोठे केले, त्यामुळे त्यांनी उद्धव साहेबांविषयी बोलू नये,” अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी नितेश राणेंना सुनावलं.