अलिबाग : इरशाळवाडी दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील सर्व दुर्गम वाडय़ा-वस्तींवर जाण्यासाठी रस्ते बांधण्यात येणार आहेत. केवळ आदिवासी वाडय़ाच नव्हे तर धनगर वाडय़ा, दलित वस्ती असतील तरी तेथेही रस्ते बांधणार. त्यासाठी ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. इरशाळवाडीचे पुनर्वसन सिडकोमार्फत करण्यात येणार आहे. सहा महिन्यांत हे पुनर्वसन केले जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील २० अतिधोकादायक गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता

सीनॉबेल कंपनीसाठी अलिबाग तालुक्यातील ३५० एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. २० हजार कोटींचा पेपर उद्योग येथे सुरू होणार आहे. माणगांव येथे लेदर क्लस्टर उभारणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या ठिकाणी तैवानच्या धर्तीवर चर्मोद्योग उभे राहणार आहेत. बल्कड्रग्ज पार्कसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहितीही पालकमंत्री यांनी दिली. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत वापरण्याजोगी आहे, असा अहवाल देण्यात आला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी पैसे देण्याचे आश्वासन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले आहे. असे असले तरी सीओईपी या संस्थेमार्फत जिल्हा रुग्णालय इमारतीचे पुन्हा ऑडिट करण्यात येणार आहे.

नवीन जिल्हा रुग्णालय कोणत्या जागेत बांधावे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. रायगड जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला आहे, अशी माहिती पालकमंत्री यांनी दिली. रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलजीवन योजनेसाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कामांची काय स्थिती आहे. त्याची चौकशी केली जाईल. तालुका स्तरावर बैठका घेऊन कामांची माहिती घेतली जाईल. त्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल, असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात महाड येथे एनडीआरएफचा तळ असावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील टीआरडीएफप्रमाणे रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिकेतही प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गावर: ठेकेदारांवर गुन्हा नोंदविणार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डय़ांमुळे अपघात झाला तर ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याचा निर्णय रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुढील आठवडय़ात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथे बैठक लावण्यात आली आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.