धुळे शहरातील पारोळा रोड परिसरातील ‘पंजाबी सॉ मिल’ येथे पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांनी मिल मालकाच्या डोक्याला बंदूक लावून आणि शस्त्रांचा धाक दाखवून हा दरोडा टाकला आहे. याप्रकरणी ‘पंजाबी सॉ मिल’चे मालक विनोद भसीन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी मिल मालक विनोद भसीन यांच्या डोक्याला बंदूक लावली. तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवत मोठा दरोडा टाकला आहे. चोरट्यांनी भसीन यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या घेत तिजोरीतील दहा लाख रुपयांची रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

मिळेलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या पंजाबी सॉ मिल येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यांनी मिल मालक विनोद भसीन यांना मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केलं. बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या राहत्या घरात धाडसी दरोडा टाकला आहे. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार विनोद भसीन हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजुलाच राहतात. याच ठिकाणी त्यांची पंजाबी सॉ मिल आहे. आपल्या कुटुंबासमवेत ते इथे राहतात. दरोडेखोरांनी घराच्या मागील दारातून प्रवेश करत हा सशस्त्र दरोडा टाकला. संबंधित पाच दरोडेखोरांपैकी चार जण अहिराणी भाषेत संवाद साधत होते. तर एकजण हिंदी भाषेत बोलत होता, अशी माहिती तक्रारदार विनोद भसीन यांनी दिली. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.