तानाजी काळे

इंदापूर : उजनीचे खास आकर्षण असलेले रोहित म्हणजेच फ्लेमिंगो हे नजाकतदार परदेशी पक्षी नुकतेच येऊन दाखल झाल्याची नोंद पक्षी अभ्यासकांनी केली आहे. पाचशेहून अधिक संख्येतील रोहित पक्षी धरण परिसरात येऊन दाखल झाल्यामुळे पक्षिप्रेमी आणि पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे.

tiger attack speeding bike Pimpalgaon Lakhni Taluka bhandara two injured
भंडारा : रात्रीचा थरार! वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर अचानक वाघाने घेतली झेप…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
rushikesh wagh junnar taluka
संशोधनातील वाघ
Himalayan vulture loksatta news
Himalayan Vulture : उरणमध्ये हिमालयीन गिधाडाला जीवदान
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…

युरोपीय देशांमध्ये मूळ वास्तव्याला असलेले हे दिमाखदार पक्षी हिवाळय़ापूर्वी भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात. या ठिकाणी नवीन पिढीला जन्म घातल्यानंतर नवजात पिल्लांसह भारताच्या प्रवासावर निघतात. पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखूड वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे वैशिष्टय़ असणारे रोहित पक्षी सध्या इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील कुगाव, केडगाव, सोगाव, वाशिंबे, कोंडार चिंचोळी, कुंभारगाव, टाकळी, कात्रज, डिकसळ, खानोटा, पळसदेव या गावांच्या शिवारात पसरलेल्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर विहार करताना नजरेस पडत आहेत.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीत उजनी धरणातून नदी, बोगदा आणि कालव्यातून २५ अब्ज घनफूटाहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर या पक्ष्यांचा दलदलीचा पानगळ जमिनीचा चराऊ भाग उघडा पडत गेल्याचा अचूक अंदाज घेत, स्थलांतरात अतिशय तरबेज असलेले रोहित पक्षी या ठिकाणी येऊन दाखल झाले आहेत.

सुमारे चार ते साडेचार फूट उंचीचे पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखूड आणि वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान ही रोहित पक्ष्यांची वैशिष्टय़े आहेत. या पक्ष्यांचा पंखाखालील भाग रक्तवर्णीय असतो. आकाशात झेप घेतल्यानंतर ते गडद लाल रंगाचे पंख ज्वाळाप्रमाणे दिसतात. या कारणामुळे या पक्ष्यांना ‘अग्निपंखी’ या नावाने संबोधतात. ज्या वेळी हे पक्षी उथळ पाण्यात उभारलेले असतात, तेव्हा ते गुलाबी रंगमिश्रित धवलवर्णीय दिसतात. या कारणामुळे त्यांना रोहित पक्षी या नावाने ओळखले जाते. मासे, खेकडे, गोगलगाय, शंख शिंपले इत्यादी मृदुकाय प्राणी, बेडूक आणि चिखलातील विविध कृमी कीटक हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असून ते पाणवनस्पती आणि शेवाळावरही ताव मारतात.
उजनीच्या पाण्यात वाढणारे अटोलिया या तांबडय़ा शैवाल पाणवनस्पतीचे सेवन केल्याने करडय़ा रंगाच्या पिल्लांना तांबडा रंग प्राप्त होतो. धरणातील पाण्यात विपुल प्रमाणात तांबडे शेवाळ वाढते हे धरणाचे वैशिष्टय़ आहे.

या वर्षी परतीच्या प्रवासाच्या वेळी प्रचंड प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे धरण काठोकाठ भरले होते. शिवाय या वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रातील भूजल पातळीही समाधानकारक असल्याने धरणातील पाण्याचे विसर्ग लांबणीवर पडल्याने तुडुंब भरून होते. त्यामुळे या पक्ष्यांना खाद्यान्न उपलब्ध होत नव्हते. या कारणामुळे या पक्ष्यांनी आपल्या प्रवासाचे वेळापत्रक बदलून आगमन लांबणीवर टाकले . गेल्या महिन्यात भीमा नदीतून आणि कालव्याद्वारे सिंचनासाठी केलेल्या पाण्याच्या विसर्गानंतर जलाशयाचा काठ उघडा पडून तेथे दलदल निर्माण झाल्याने रोहित पक्षी उजनीच्या हक्काचा पाहुणचार झोडपण्यात दंग झाले आहेत.

उजनीवरील पक्ष्यांचे निरीक्षण आणि नोंदी घेण्यासाठी मी कित्येक वर्षांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रावर फिरत आहे. वर्षभरात अनेक वेळा उजनीला भेट देऊन तेथील पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करतो. स्थलांतरित पक्षी नेहमी हवामानाचा अंदाज घेत धरण परिसरात येतात. यावर्षी ऋतुचक्र अनियमित होऊन रोहित पक्ष्यांच्या स्थलांतरावर परिणाम झाला होता. सतत बदलणाऱ्या हवामानातही रोहित पक्षी उजनीवर येऊन दाखल झाल्याने उजनीचे सौंदर्य वाढले आहे.- डॉ. अरिवद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक

Story img Loader