Rohit Patil on Devendra Fadnavis : राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील हे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधानसभेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आज विशेष अधिवेशनात पहिल्यांदाच विधानभवनात भाषण केलं. यावेळी त्यांनी शाब्दिक कोट्या करून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. सर्वांत तरुण आमदार असल्याने सर्वांत तरुण अध्यक्षाने माझ्याकडे विशेष लक्ष द्यावं, अशीही मागणी त्यांनी केली. विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.

“आज या देशाचं वेगळेपण टीकून आहे त्याचं कारण असं आहे की अनेक शाह्या या देशाने पाहिल्या.. पण लोकशाही या देशाच्या वाट्याला आली ज्यामुळे संबंध जगामध्ये आपलं देश वेगळेपण टिकवून ठेवू शकलं. त्याचं दुसरं कारण संसदीय पद्धत आपण कमावली, त्यामुळे लोकशाहीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला त्यानुसार सदस्य येथे बसले आहेत. आपल्याला विनंती करेन की सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला आहे तसा मी सर्वांत तरुण सदस्य म्हणून मान पटकावला आहे. मंत्रिमंडळाच्या या तरुण सदस्याकडे बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. माझ्याकडे लक्ष असावं याचं कारण मी सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबरवरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जशी तुम्ही मदत करता, तशीच मलाही कराल”, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा >> Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!

पुराणांमध्ये अमृताला महत्त्व

ते पुढे म्हणाले, “संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आला आहे. “अमृताहून गोड तुझे नाम देवा”, आता संतांच्या वाणीतूनसुद्धा आपलं नाव गोड पद्धतीने घेतलं गेलंय. पुढच्या काळात काम करत असातना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूक द्याल अशी विनंती करतो.” असं म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. देवेंद्र फडणवीसांनीही मिश्किल हास्य केलं. त्यावर रोहित पाटील पुढे म्हणाले, “अमृताहूनी मुद्दाम म्हणालो. पुराणांमध्ये अमृताला वेगळं महत्त्व आहे. आजही आहे. फडणवीस मी विनंती करेन की विरोधी पक्षालाही सहकार्य कराल.”

Story img Loader