सिंचन घोटाळ्याचा आरोपानंतर माझी खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. त्याबाबत मला माहिती नव्हतं, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तासगाव-कवठे महांकाळ येथील एका प्रचारसभेत त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या आरोपाला आता आर. आर. पाटील सुपूत्र रोहित पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय म्हणाले रोहित पाटील?

“आज अजित पवार जे काही बोलले ते मी एकलं. माझे वडील जाऊन आज नऊ वर्ष झाली आहेत. त्यानंतर दादांनी असं विधान केल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना दुखं झालं आहे. खरं तर त्यावेळी नेमकं काय घडलं असेल, याबाबत आम्ही आबा हयात नसताना उत्तरं देऊ शकत नाही. आबा गेले त्यावेळी माझं वय केवळ १५ वर्ष होतं. त्यामुळे तेव्हा काय घडलं असेल, याची कल्पना मला नाही. पण अजित पवारांच्या विधानाने दुख: नक्कीच होतं आहे”, असं रोहित पाटील म्हणाले.

हेही वाचा – “आर. आर. पाटलांनी माझा केसानं गळा कापला, फडणवीसांनी मला…”, अजित पवारांचा धक्कादायक खुलासा

“माझ्या वडिलांनी ( आर.आर. पाटलांनी ) प्रामाणिकपणे काम केलं. गृहमंत्री असताना अतिशय पारदर्शीपणे पोलीस भरती करून घेतली. चांद्यापासून बांद्यापर्यंत आबांनी चांगलं काम करून दाखवलं. अत्यंत सक्षमपणे गृहमंत्रीपद सांभाळल्यानंतर अशाप्रकारचा आरोप त्यांच्यावर होत असेल, तर ते दुर्दैवी आहे”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

“आज आबा जाऊन नऊ वर्ष झाली आहेत. आज ते हयात असते, तर त्यांनी अजित पवारांच्या या आरोपाला उत्तर दिलं असतं. पोलीस भरती असेल किंवा डान्सबारचा प्रश्न असेल, गृहमंत्री म्हणून आबांनी अतिशय पारदर्शीपणे काम केलं. डान्सबारच्या वेळी तर त्यांना बऱ्याच ऑफर होत्या. मात्र, त्यांनी महिलांची अब्रू वाचवण्याकरिता डान्सबार बंद करण्याचा निर्णय घेतला. अशा व्यक्तीबद्दल असे आरोप करणं, तेही प्रचारसभेत, हे चुकीचं आहे. तासगावात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची परिस्थिती काही चांगली नाही. त्यामुळे अजित पवार अशाप्रकारचे आरोप करत आहेत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार

अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं होतं?

केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली होती. ती फाईल गृहखात्याकडं गेल्यानंतर आर. आर. पाटीलनं माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसानं गळा कापयाचे धंदे झाले राव. नंतर आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागली. राष्ट्रपती राजवट लागल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. निवडून आलेलं सरकार यावर निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार निवडून आलं. फडणवीस यांनी फाईलवर स्वाक्षरी केली. त्यांनी मला घरी बोलावलं आणि फाईल दाखवली. ते म्हणाले, तुमच्या आबाने तुमची चौकशी करण्यासाठी या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आता मला मुख्यमंत्री म्हणून सही करावी लागेल. मला त्यादिवशी खूप वाईट वाटलं”, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.