माझ्या मतदारसंघात असलेल्या आणि इतर प्रश्नांबाबत अजितदादांना भेटलो. उपस्थित केलेले प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेणं ही दादांची स्टाईल आहे. ती मला भावते, या प्रश्नांवरही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काम करण्याच्या शैलीचं रोहित पवार यांनी कौतुक केलं आहे. रोहित पवार यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातली ही पहिलीच भेट होती.

रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटरवर अजित पवारांसोबत घेतलेल्या भेटीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या निर्णय घेण्याच्या शैलीचं कौतुकही केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं होतं. एवढंच नाही तर राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यानंतर याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असता माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडीची किंमत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यानंतर अजितदादा नाराज झाल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या. या सगळ्या घडामोडींनंतर रोहित पवार यांनी पहिल्यांदाच अजितदादांची भेट घेतली आणि आपल्याला त्यांची निर्णय घेण्याची पद्धत आवडते असं भाष्य करत त्यांच्या कामाच्या शैलीचं कौतुक केलं.