Rohit Pawar on Santosh Deshmukh Murder Case Dhananjay Deshmukh Protest : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ३५ दिवस उलटूनही अद्याप या हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर, वाल्मिक कराडविरोधात कठोर कारवाई झालेली नाही. अद्याप या प्रकरणात कोणालाही शिक्षा झालेली नाही. वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधी व सत्ताधारी पक्षांमधील नेते, आमदार वाल्मिक कराडवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात आहेत. भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत. मात्र, त्यांना ही लढाई लढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे संतापलेल्या धनंजय देशमुख यांनी आज (१३ जानेवारी) आंदोलन केलं. धनंजय देशमुखांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली. तसेच, मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज ते टॉवरवर चढले. तर, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी देखील गावात तीव्र आंदोलन केलं. धनंजय देशमुखांनी आत्महत्या करू नये यासाठी प्रशासन व अनेक नेत्यांनी त्यांची विनंती केली. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुखांना विनवण्या केल्या. त्यानंतर तब्बल दोन तासांनी त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं व ते टॉवरवरून खाली उतरले. मात्र, ३५ दिवसांनंतरही कोणत्याही आरोपीला कठोर शासन झालेलं नसल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी एक्स या समाजमाध्यमावर याबाबत नाराजी व्यक्त करणारी पोस्ट केली आहे. पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं”.

Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? विचारताच पोलीस अधीक्षकांचं उत्तर; म्हणाले, “मी…”
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Supriya Sule
Supriya Sule : वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, अमित शाहांना म्हणाल्या…
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News LIVE Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Ashwini Deshmukh
Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांना भीती वाटत होती, गुंड प्रवृत्तीचे लोक…”, हत्येच्या दोन दिवस आधी काय घडलं? पत्नीने सांगितला घटनाक्रम!
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
Torres Scam
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड!
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”

हे ही वाचा >> Maharashtra News LIVE Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप

रोहित पवारांचा सरकार व पोलीस प्रशासनावर संताप

रोहित पवार म्हणाले, “राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता गुळगुळीत, मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडलं तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल हेही लक्षात असू द्या”.

Story img Loader