Rohit Pawar on Santosh Deshmukh Murder Case Dhananjay Deshmukh Protest : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ३५ दिवस उलटूनही अद्याप या हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर, वाल्मिक कराडविरोधात कठोर कारवाई झालेली नाही. अद्याप या प्रकरणात कोणालाही शिक्षा झालेली नाही. वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधी व सत्ताधारी पक्षांमधील नेते, आमदार वाल्मिक कराडवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात आहेत. भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत. मात्र, त्यांना ही लढाई लढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे संतापलेल्या धनंजय देशमुख यांनी आज (१३ जानेवारी) आंदोलन केलं. धनंजय देशमुखांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली. तसेच, मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज ते टॉवरवर चढले. तर, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी देखील गावात तीव्र आंदोलन केलं. धनंजय देशमुखांनी आत्महत्या करू नये यासाठी प्रशासन व अनेक नेत्यांनी त्यांची विनंती केली. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुखांना विनवण्या केल्या. त्यानंतर तब्बल दोन तासांनी त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं व ते टॉवरवरून खाली उतरले. मात्र, ३५ दिवसांनंतरही कोणत्याही आरोपीला कठोर शासन झालेलं नसल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा