काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झालं होतं. यावरून राज्यातील भाजपा, शिंदे गट आणि मनसेने आक्रमक काँग्रेसविरोधात भूमिका घेतली होती. तर, राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आरोपांवर टीका करताना भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका हिंदी वृत्तवाहिनीवर बोलताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, “राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. पण, आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो?,” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं. या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सुधांशू त्रिवेदी यांच्यावर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : “आमदारकी पदरात पाडण्यासाठी सुषमा अंधारे…”, शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका

“छत्रपती शिवाजीमहाराज आणि महात्मा फुले यांच्यावर अलिकडच्या काळात अन्यायकारक बोललं गेलं. याचा भाजपाच्या कोणत्याही व्यक्तीने निषेध व्यक्त केला का? शिवाजी महाराजांनी दिल्ली हदरवून ठेवली होती. त्या दिल्लीत बसून भाजपाचा प्रवक्ता म्हणतो, महाराजांनी माफी मागितली. अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागायच्या लायकीचासुद्धा ठेवणार नाही,” असा इशारा रोहित पवार यांनी त्रिवेदींना दिला आहे.