Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसह किती आमदार गेले आहेत याबाबत अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. काल (२ जुलै) शपथविधी कार्यक्रमात अजित पवारांसोबत दिसणारे अमोल कोल्हे यांनी आज शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. तसंच, अजित पवारांच्या संपर्कात असलेल्या अनेक आमदारांनी सध्या तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांकडे आमदारांचं संख्याबळ किती आहे, हे अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.

“काही महिन्यांपूर्वी भाजपाकडून शिवेसना फोडण्यात आली. तसाच प्रयत्न आता राष्ट्रवादीवर भाजपाकडून झाला. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात भाजपा-शिंदे सरकारच्या काळात मोठ्या लोकांचा अनादर झाला, तेव्हा शासन गप्प बसलं. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला खदखद होती. आता तर कहर झाला आहे. भाजपाने राष्ट्रवादीच्या बाबतीत जे केलं ते पटलेलं नाही. मी एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता वा जनता यांना या गोष्टी पटलेल्या नाहीत. राष्ट्रावादीवर असा प्रयत्न झाल्यानंतर शरद पवार घरी न थांबता दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यास गेले. महाराष्ट्राने सतत संघर्ष करायला शिकवला आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा >> NCP Split: “अडीच वर्षांपूर्वी त्यांनी शपथ घेतली, तेव्हा…”, शरद पवारांचा अजित पवारांना टोला; थेट आणीबाणीचं दिलं उदाहरण!

पवारांनी लढायचा संदेश दिला

“पवारांची हीच खासियत आहे. आघात झाला, अडचण आली तर शातं बसायचं नाही, लढायचं. पवारांनी दिलेला हा संदेश आहे. पाच तारखेला पवारांनी आणि जयंत पाटलांनी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय चर्चा होतेय, हे महाराष्ट्राला कळेल. तेव्हाच समजेल की कोणासोबत किती आमदार आहेत”, असं रोहित पवार म्हणाले.

शिंदे गट नाराज, पण आम्ही पुन्हा उभे राहणार

“काल शपथविधीला शिंदे गटाच्या चेहऱ्यावर फार खुशी नव्हती. त्याबाबतीत उद्धव ठाकरे गटाकडूनही टीका झाली. आमच्या सर्वांसाठी या गोष्टी दुसऱ्या पातळीवरच्या आहेत. लोकांशी चर्चा आणि संघटन परत एकदा उभं करणं हे शरद पवारांच्या मार्गदर्शाने होत आहे, आम्ही याचा भाग आहोत, याचा अभिमान आहे. काय उद्या होईल, हे सांगता येणार नाही. कदाचित काँग्रेसवरही असाच प्रयत्न होऊ शकतो”, असंही रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “ज्या पक्षाचे संख्याबळ अधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता” वडेट्टीवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मोठा भाऊ, छोटा भाऊ हा वाद करण्याऐवजी…”

पन्नास खोके ओरडणारे त्यांच्याच गटात गेले

“आम्हाला लहानपणापासून प्रेम, आदर शिकवला आहे. दिलेला शब्द पाळणं शिकवलं आहे. या परिस्थिततही सकारात्मक दृष्टीकोनाने बघायला शिकवलं आहे. त्यामुळे प्रेमाकडे आम्ही पाहतो. आज सत्तेत गोंधळ पाहिला तर जे पायऱ्यांवर उभे राहून पन्नास-पन्नास खोके शिंदे गटाला बोलते, तेच शिंदे गटाकडे आता मंत्री झाले आहेत. हे काय चाललंय हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

Story img Loader