धाराशिव : अजित पवार यांच्या गुप्त भेटीबाबत आपल्याला माहिती नाही. जरी अशी भेट झाली असेल तर त्यात काहीच वावगे नाही. एवढ्या वर्षाचे कौटुंबिक संबंध थोडेच संपणार आहेत? अजित पवार यांनी वेगळी वैचारिक भूमिका स्वीकारली म्हणून त्यांच्यासोबत सतत भांडण करायला हवे काय? वैचारिक विरोध असला तर संवाद बंद होता कामा नये. शरद पवार यांचा संवादावर विश्वास आहे. त्यामुळे एखाद्या गटावर ऊर्जा खर्च करीत बसण्यापेक्षा भाजपाला टार्गेट करण्याचे आम्ही ठरवले आहे. आणि हाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण मराठवाडा दौऱ्यावर असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, जीवन गोरे, माजी आमदार राहुल मोटे, संजय निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांनी घर फोडले, ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याविरोधात प्रखर भूमिका घेणार आहोत. भाजपावर संवैधानिक बॉम्ब फेकल्यावर त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आपोआप नेस्तनाबूत होतील असा दावाही रोहित पवार यांनी केला. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोग्य खात्यातील रखडलेल्या भरती प्रक्रियेबद्दल पवार यांनी परखड शब्दात टीका केली. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रोष आहे. त्यामुळे शिंदे गटातील १५ आमदार परत उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या तशी बोलणी सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेणार का हे काळच ठरवेल. एकंदरीत राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सरकार धास्तावले आहे. लोकांच्या हिताचे प्रश्न घेऊन लढण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे यासाठी स्वहित बाजूला ठेवून संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हा हाच संदेश साहेबांनी दिला आहे. तोच सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण मराठवाडा दौऱ्यावर असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!
Konkan has been left behind due to electing the wrong people till date says Raj Thackeray
चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिल्याने कोकण मागे पडले – राज ठाकरे

हेही वाचा – तिघांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

काही कॉन्ट्रॅक्टर विचारांच्या लोकांनी राजकारणातील नैतिकता बाजूला सारून सत्ता जवळ केली आहे. त्यामुळे एकूण राजकीय पातळी खालच्या थराला गेली आहे. सत्तेच्या आडोश्याला जाऊन बसलेल्या गटातटातील मंडळीला काय वाटते त्यापेक्षा राज्यातील नागरिक आज काय विचार करताहेत हे अधिक महत्त्वाचे आहे. लोकांच्या समोर असलेल्या समस्या काय आहेत हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वहित बाजूला ठेवून संघर्ष करण्याची तयारी ठेवा असा संदेश शरद पवार यांनी दिला आहे. तोच संदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठवाडा दौरा सुरू केला असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – “…तर आम्ही कधीही सहन करणार नाही”, शरद पवार-अजित पवार भेटीवरून नाना पटोलेंचा सूचक इशारा

बीडपासून शरद पवारांचा राज्य दौरा

येणाऱ्या १७ ऑगस्ट रोजी शरद पवार यांची बीड शहरात भव्य सभा होणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सभेचे नियोजन सुरू आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत संघर्षाचा संदेश देण्यासाठी स्वतः शरद पवार राज्यदौरा करणार आहेत. दर आठवड्याला दोन सभा याप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांत लढण्याचा संदेश दिला जाणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.