आपल्या काही लोकांनी पक्षातून बाहेर पडताना पक्ष, चिन्ह आणि आपली जागा चोरून नेली. मात्र, त्यांनी कितीही जागा चोरायचा प्रयत्न केला, तरी शरद पवारांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. तसेच या निवडणुकीत सुप्रिया सुळे या तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ते बारामतीतील प्रचारसभेत बोलत होते.
हेही वाचा – “अरे मामा जरा जपून, लक्षात ठेवा, सरळ करायला वेळ लागणार नाही”; शरद पवारांचा इशारा कुणाला?
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
“बारामतीत मी अनेकदा सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला आहे. मात्र, यंदाचं वातावरण जरा वेगळं आहे. कारण आपल्यातील काही लोक आता भाजपाबरोबर गेले आहेत. एक कुटुंबातील सदस्य म्हणून मला या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतं. पण हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी जाताना पक्ष आणि चिन्ह चोरून नेले एवढंच नाही तर त्यांनी आपली जागाही चोरून नेली. मात्र, त्यांनी कितीही जागा चोरायचा प्रयत्न केला, तरी शरद पवार यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
“शरद पवार हे जनतेच्या हृदयात”
“शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशातील जनतेच्या हृदयात आहेत. त्यांनी गेल्या ६० वर्षात महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेच्या हितासाठी काम केलं आहे. त्यांनी प्रचाराची सुरुवात सायकलवरून केली होती. त्यावेळी त्यांच्या प्रचाराला हजर असलेल्या प्रत्येक कार्यकर्तांची नावे त्यांना आजही तोंडपाठ आहेत. सुरुवातीला आमदार त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री ते कृषीमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. पद असताना त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा फायदा आजही अनेकांना होतो आहे. त्यामुळेच शरद पवार यांची जागा घेणं सोपी नाही”, असेही ते म्हणाले.
“सुप्रिया सुळे तीन लाख मतांनी निवडून येतील”
पुढे बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. “चार तारखेला सुप्रिया सुळे यांची विजयाची सभा कशी असेल, याचे ट्रेलर आज बारामतीतील जनेतेने दाखवून दिलं आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे या तीन ते साडेतीन लाख मतांनी निवडून येतील, असा मला विश्वास आहे”, असे ते म्हणाले.