जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांच्या या विधानावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी या विधानावरून फडणवीसांवर खोचक शब्दात टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – शरद पवारांनी राजीनामा मागे घेताना अनुपस्थित असलेल्या अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

काय म्हणाले रोहित पवार?

“देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानाची आम्हाला कोणतीही भीती नाही. याची भीती खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटायला हवी. देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणतात, पण ते कोणत्या पदावर येतील, याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावं, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली. मुळात त्यांचं हे विधान आमच्यासाठी नव्हतं, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी होतं”, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – “पक्षांतर्गत बंड शमवण्यासाठी अन्…”; शरद पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावरून संजय शिरसाटांची टोलेबाजी!

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ‘मी पुन्हा येईन’, असं विधान केलं होतं. “पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवतच नरसिंग आहे. आपण कुठूनही प्रगती करतो”, असं ते म्हणाले होते.