अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे उभारण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून गुरुवारी सायंकाळी सहा वाजता उद्घाटनासाठी आलेले आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी केंद्राबाहेर अडविले. यावेळी पोलीस व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अखेर शिक्षण केंद्रामध्ये घुसून आमदार रोहित पवार यांनी उद्घाटन केले. कार्यकर्त्यांनी रिबन बांधली अधिकृतपणे त्याचे उद्घाटन केले यानंतर आमदार रोहित पवार यांनी स्वतः गुलाल उधळला. यानंतर कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या जल्लोषात या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> धनगर आरक्षण मागणीसाठी नगरमध्ये दोघा आंदोलकांची गोदावरीत उडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती

या प्रशिक्षण केंद्रापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर या केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठी जाहीर सभा झाली  त्याच ठिकाणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये या केंद्राचे अधिकृत उद्घाटन झाल्याचे देखील श्री देशमुख यांनी जाहीर केले. यावेळी अनिल देशमुख यांनी या प्रशिक्षण केंद्रासाठी मी स्वतः गृहमंत्री असताना परवानगी दिली आहे. हे केंद्र राज्यात दुसरीकडे हलवण्यात आलेले असताना आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून ते पुन्हा जामखेड तालुक्यातील कुसड गाव येथे आणले. या केंद्राला मंजुरी माझ्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आलेले आहे. असे श्री देशमुख यांनी यावेळी सांगतानाच विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता श्री देशमुख यांनी टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar inaugurated police training center despite denied permission zws