Rohit Pawar Targets PM Narendra Modi: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा अपेक्षित असताना त्याबाबत निवडणूक आयोगानं वेगळी भूमिका घेतली. या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, असं असताना दुसरीकडे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापू लागलं आहे. नेतेमंडळी वेगवेगळ्या यात्रांमधून आपली भूमिका मांडत आहेत. विरोधकांवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर निवडणुका असणाऱ्या राज्यांचे दौरे करत असून महाराष्ट्रात येणं टाळत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, शरद पवारांना नरेंद्र मोदींनी लगावलेल्या टोल्यावरूनही त्यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Eknath SHinde Ravi Rana
Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”
Ajit Pawar on pratibha pawar
Ajit Pawar : “प्रतिभाकाकी मला आईसमान, पण मला पाडण्याकरता घरोघरी जाऊन प्रचार?” अजित पवारांचा सवाल
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
Leader of Opposition in Lok Sabha and Congress leader Rahul Gandhi.
Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?

“एक-दोन महिन्यांत निवडणुका असणाऱ्या राज्यात दोन-तीन दिवसाआड कार्यक्रम घेणारे पंतप्रधान मोदी साहेब निवडणुका जवळ आल्या असतानाही महाराष्ट्रात कार्यक्रमास येणे टाळत आहेत. विकासाच्या बाबतीत तसेच बजेटमध्ये केंद्राकडून दुर्लक्षित झालेला महाराष्ट्र आता राजकीय बाबतीतही दुर्लक्षित होत असल्याची चर्चा आहे”, असं रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“केंद्रीय नेतृत्वाला परिवर्तनाचा अंदाज”

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला परिवर्तनाचा अंदाज आला असावा, अशी खोचक टिप्पणी रोहित पवार यांनी केली आहे. “राज्य सरकार विरोधात असलेल्या रोषातून महाराष्ट्रात वाहणाऱ्या परिवर्तनाच्या वाऱ्याचा अंदाज केंद्रीय नेतृत्वाला आला असावा किंवा ‘भटकत्या आत्म्या’ची भीती अजूनही उतरली नसावी, म्हणूनच महाराष्ट्राकडं दुर्लक्ष केलं जात असेल. पण परिवर्तनानंतर लवकरच महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृतपणाचं आणि आर्थिक सत्तेचं गतवैभव प्राप्त होईल, याची खात्री आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“अतृप्त आत्मा ५० नाही, तर ५६ वर्ष झाली महाराष्ट्रात भटकतोय, पण तुमच्यासारखी व्यक्ती…” शरद पवारांचा पुन्हा पंतप्रधान मोदींना टोला!

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २९ एप्रिल रोजी पुण्यात घेतलेल्या सभेत शरद पवारांवर नाव न घेता खोचक टीका केली होती. “आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मा असतात. त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही ते दुसऱ्याच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात. ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात, कुटुंबातही ते असंच करतात. १९९५ मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपाचं सरकार अस्थिर करु पाहात होता. २०१९ मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केलं ते महाराष्ट्राला माहीत आहेच. आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या अतृप्त आत्म्याने सुरु केला आहे”, असं पंतप्रधान म्हणाले होते.