मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवल्यानंतर आमदार संदीप क्षिरसागर यांचाही बंगला पेटवण्यात आला आहे. तसेच संतप्त आंदोलकांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालयही आगीच्या हवाली केलं आहे.

राज्यात हिंसाचार वाढत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या प्रचारासाठी छत्तीसगड दौऱ्यावर गेले आहेत. या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. महाराष्ट्र जळत असताना तुम्ही गृहमंत्री असूनही इतर राज्यात निघून जाता, याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरित्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का? असा सवाल रोहित पवरांनी विचारला.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”

हेही वाचा- VIDEO: मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर पेटवलं, वाहनं जाळली

आमदार रोहित पवार यांनी’एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) देवेंद्र फडणवीसांच्या काही ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. संबंधित पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, “आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय… पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात. कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार… तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?”

हेही वाचा- “घरात घुसून गोळीबार करण्याइतपत…”; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या…

“एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का?” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.

Story img Loader