Rohit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. पण यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निकालाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी हा जनतेचा कौल नाही असंही म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या विजयी उमेदवारांची शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा पार पडली.
या चर्चानंतर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत बैठकीत काय ठरलं? याविषयी माहिती सांगत महायुतीवर हल्लाबोल केला. तसेच निवडणूक आयोगाला थेट आव्हान देत ‘आम्हाला चार दिवस ईव्हीएम मशीन द्या. मग आमचे तज्ञ लोकं मशीन तपासतील. त्या मशीनची चिकित्सा करु आणि मग आश्वस्त होऊ’, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : काँग्रेसच्या कार्यक्रमात राहुल गांधींचा माइक बंद; संविधान दाखवत सावरकरांबद्दल म्हणाले…
रोहित पवार काय म्हणाले?
“आजच्या बैठकीला आलेले सर्व उमेदवार हे विजयी झालेले आणि पराभूत झालेले होते. आमचे कार्यकर्ते आणि मतदार आम्हाला भेटल्यानंतर ते सांगतात की आम्ही चांगलं मतदान केलं. पण त्यात नाशिकमधील उदाहरण दिलं गेलं. काही गावात आमचं गाव असूनही कमी मतदान झालं. आजच्या बैठकीत काही उमेदवारांनी पुन्हा मतमोजणीची मागणी करत आहेत. माझ्या मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा या मतदारांमध्ये मोठी वाढ झाली, हे मतदार आले कुठुन? की हे मतदान मशीनमधून आले? मागच्या विधानसभेत आणि आता ९८ लाख मतदान वाढलं. सगळ्यांची मागणी अशी होती की खोलात जाण्याची गरज आहे. फक्त सत्तेतील लोकं निवडून येणार असतील आणि पैसेवाले पुढे येणार असतील तर सामान्यांचे विषय कोण मांडणार? काही लोक असे निवडून गेलेत जे बोलण्यात सभ्य भाषा कधीच वापरत नाहीत. आता आम्ही या सर्व गोष्टींबाबत लीगल विषय हॅण्डल करणारी एक कमिटी निर्माण केली”, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.
“एकतर ५ वर्ष आम्ही विरोधात राहणार आहोत, त्यामुळे लढाई लढवीच लागेल. ज्या-ज्या गोष्टी घडल्या त्यात गुंडांचा वापर झाला, पैशांचा वापर झाला. परळीचं उदाहरण दिलं. लोकसभेलाही झालं होतं. ही गोष्ट लोकशाहीला घातक आहे. राजेसाहेब देशमुखांवर बाचाबाची झाल्यावर ३०७ कलम का टाकलं? एका मोठ्या नेत्याने सांगितल्यानंतर ३०७ कलम लावलं जातं. आमच्याकडे पैसे, गुंड नव्हते, गुजरातच्या ईव्हीएमवर आमचा अंकुश नव्हता. आमचे काही लोक हरले असले तरी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. परत असे घडू नये यासाठी न्यायालयात जाऊ”, असंही रोहित पवार म्हणाले.
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घ्या’
“केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही आवाहन करतो की, आमच्या शंकांचं निरसन करावं. न्यायालयाने देखील तसे आदेश दिले पाहिजेत. आम्हाला ४ दिवस ईव्हीएम द्या. कॅमेरे लावा, आमचे तज्ञ लोकं मशीन तपासतील. निवडणूक आयोगाने चार दिवस द्यावेत, मग आम्ही जी मशीन सांगू ती तपासायला द्यावी”, अशी मोठी मागणी रोहित पवार यांनी केली.
महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
“एकनाथ शिंदे यांना परत मुख्यमंत्री बनायचं आहे. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असलं तरी केंद्रातून निर्णय होणार आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये महिलांना आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वाट आम्ही पाहत आहोत. पण त्याआधी त्यांना लाडकी खूर्ची महत्वाची आहे. एक अधिवेशन आम्ही बघणार आहोत, तोवर आम्ही आक्रमक होणार नाही. आता आम्ही ईव्हीएमबद्दल आक्रमक झालो आहोत. निवडणूक आयोग आणि न्यायालयाला विनंती आहे की, आम्हाला ४ दिवस मशीन द्या, त्या मशीनची चिकीत्सा करु द्या आणि आम्हाला आश्वस्त होऊ द्या”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.