पुणे पोलिसांच्या येरवडा येथील तीन एकर जमिनीचा २०१० मध्ये विभागीय आयुक्तांनी लिलाव केला होता. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ही जमीन हस्तांतरित करम्याच आदेश दिला होता. मात्र, पोलिसांच्या कार्यालय आणि घरांसाठी आवश्यक असल्याचं सांगत जमिनीच्या हस्तांतरणास नकार दिल्याचा गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला आहे.
बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या आगामी पुस्तकात त्यांचे पोलीस दलातील अनुभव कथन केले आहे. पुस्तकातील एका प्रकरणात पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री यांनी येरवड्यातील मोक्याच्या जागेच्या हस्तांतरणाचे आदेश दिल्याच्या घटनेची माहिती दिली आहे. बोरवणकर यांनी पुस्तकातील प्रकरणात अजित पवार यांचं थेट नाव न घेता ‘दादा’ असा उल्लेख केला आहे.
बोरवणकरांच्या गौप्यस्फोटानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी चौकशीची मागणी केली आहे. आता आमदार रोहित पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. “माझ्यावर चौकश्या सुरु आहेत. तर सत्तेतील लोकांच्या चौकशा सुरू करायला काय हरकत आहे?” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
हेही वाचा : “मिंधे गटातील १३ पैकी १० खासदारांचं विसर्जन होणार, लोकसभेआधी…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान
“सत्तेतील लोकांच्या चौकश्या सुरू करायला काय हरकत?”
सत्तेतील लोकांच्या चौकश्या सुरू करायला काय हरकतरोहित पवार म्हणाले, “पुस्तक लिहिणाऱ्या नावाजलेल्या अधिकारी आहेत. त्यामुळे सरकारनं आरोपांची शहनिशा करावी. कुणी कुठली जमीन घेतली, भ्रष्टाचार केला, कोण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यापेक्षा युवकांवर चर्चा करण्याची गरज आहे. पण, माझी विविध स्वायत्त संस्थांकडून चौकशी सुरू आहे. माझ्यावर चौकश्या सुरू आहेत, तर सत्तेतील लोकांच्या चौकश्या सुरू करायला हरकत काय आहे?”
बोरवणकरांनी पुस्तकात काय म्हटलं?
‘‘येरवड्यात पुणे पोलिसांची मोक्याच्या ठिकाणी तीन एकर जागा आहे. २०१० मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्तांनी मला दूरध्वनी केला आणि ‘दादांना तुम्हाला भेटायचे आहे’, असा निरोप दिला. त्यानंतर मी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी येरवड्यातील तीन एकर जमिनीबाबत चर्चा झाली. ही जागा पुणे पोलिसांची आहे, भविष्यातील पुण्याचा वाढता विस्तार घेऊन ही जागा पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या जागेत पोलिसांचे कार्यालय बांधण्यात येणार आहे. तेथे पोलीस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे,’’ असे मी सांगितले, असे बोरवणकर यांनी म्हटले आहे. या जागेच्या लिलावातून शासनाला चांगला महसूल मिळणार असल्याचे त्या वेळी पालकमंत्र्यांनी सांगितले होते, अशी माहितीही बोरवणकर यांनी या पुस्तकात दिली आहे.
हेही वाचा : मराठा अन् ओबीसी आरक्षण, दुष्काळ, समृद्धी महामार्ग अपघात, नाना पटोलेंची सरकारवर चौफेर टीका
“माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी..”
“रेडी रेकनरनुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाते. त्यामुळे या प्रकरणात माझा काहीही सहभाग नाही. अशा प्रकरणात मी सरकारची बाजू कशी घेतो, याची माहिती तुम्हाला प्रशासनाकडून मिळेल. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याची चिंता करत नाही,” असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं.