Rohit Pawar : राज्यात सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे अनेकांचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज आमदार रोहित पाटील आणि अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादी शरद पवार गटात नेमकं चाललंय काय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, आता या भेटींवर आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘बरेचसे आमदार काय? मी देखील अजित पवारांना भेटलो. ते सत्तेत आहेत त्यामुळे काही विकासाचे कामे मार्गी लावायचे असतात तर भेटावं लागतं’, असं स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिलं आहे.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sharad Pawar , Ajit Pawar, Sharad Pawar latest news,
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”

रोहित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार म्हणाले, “बरेचसे आमदार काय? काल मी देखील अजित पवार यांना भेटलो. आता अजित पवार सत्तेत आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत. मग असे काही विषय असतात ते राजकीय नसतात पण विकासाचे असतात. ते विषय मार्गी लावायचे असतील तर मग सत्तेत असणाऱ्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा : कल्याण मारहाण प्रकरण: अखेर अखिलेश शुक्लांनी दिलं स्पष्टीकरण; देशमुख कुटुंबानंच पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप!

“आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल भेटलो. समजा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली तर त्यांच्याकडे आम्ही मतदारसंघाचे काही विषय किंवा राज्याचे काही विषय मांडू शकतो. त्यामध्ये राजकारण केलं नाही पाहिजे. आज दुर्देवाने राजकारण केलं जातं. आम्ही विरोधात असलो तरी मतदारसंघासाठी प्रयत्न करावे लागतात. त्याची वेगळी चर्चा होणं योग्य नाही. अजून पाच वर्ष त्यांच्याकडे २२२ आमदार आहेत, त्यामुळे आमच्या सारख्यांची गरज त्यांना असेल असं वाटत नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader