भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांची युती आहे. मग, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपानं बैठका, सर्वे आणि चाचपणी घेण्याचं कारण काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मंत्री रवींद्र चव्हाण यांना कदाचित कल्याणमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ते कल्याणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणमध्ये भाजपाच्या बैठका सुरू आहेत. याबाबत प्रश्न विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “यावरून समजून जायचं की भाजपाच्या मनात काय आहे. भाजपा नेहमी लोकनेत्यांना संपवतं. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांना राजकीय दृष्टीकोणातून संपवलेलं सर्वांनी पाहिलं आहे. अन्य पक्षातून घेतलेले लोकनेतेही संपले आहेत. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या लोकांचंही महत्व कमी केलं जाईल.”

हेही वाचा : “या सगळ्यामागे दिल्लीचा अदृश्य हात”, सुप्रिया सुळेंचा आरोप; म्हणाल्या, “अध्यक्ष दिल्लीला जातात आणि लगेच…”

“भाजपा आणि शिवसेना शिंदे गट युती आहे. मग श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपानं बैठका, सर्वे आणि चाचपणी घेण्याचं कारण काय? भाजपाला फक्त त्यांचं चिन्ह आणि पक्ष समजतो. बाकी कोणतेही नेते आणि लोकांचं प्रश्न समजत नाहीत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

“बरोबर गेलेले सर्व नेते भाजपाच्या चिन्हावर लढतील. तर, रवींद्र चव्हाण यांना कदाचित कल्याणमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : सुप्रिया सुळेंचं ‘ते’ विधान अजित पवारांसाठी नव्हतं? स्वत:च स्पष्टीकरण देत म्हणाल्या…

अजित पवार गटात पक्षबांधणीतच गटबाजी दिसून आली आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “अजित पवार गटात फक्त बीड जिल्ह्यातच गटबाजी नाही. अजित पवार गटातील बऱ्याच कार्यकर्त्यांना भाजपाबरोबर गेल्यानंतर सुरूवातीला गारगार वाटलं. पण, आता भाजपाची प्रवृत्ती दिसत आहे. त्यांच्या मोठ्या गटात अस्वस्थता जाणवत आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar on shrikant shinde and ravindra chavan kalyan loksabha ssa