अलीकडेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ४० आमदार अजित पवारांबरोबर असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार रोहित पवार हे शरद पवार गटाची भूमिका प्रखरपणे मांडताना दिसत आहेत. असं असलं तरी सत्तेत सहभागी होण्यापूर्वी अजित पवारांनी रोहित पवारांना ऑफर दिली होती का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. यावर आता रोहित पवारांनी स्वत: उत्तर दिलं आहे.

भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली होती का? यावर रोहित पवार म्हणाले, “माझी भूमिका इतकी स्पष्ट आहे की त्यांनी (अजित पवार) मला विचारलंच नाही.” ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Sharad Pawar Ajit Pawar fb
“बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ajit Pawar
Ajit Pawar : RSS कडून लोकसभेतील पराभवाचं खापर, विचारधाराही वेगळी, तरी महायुतीत का? अजित पवार म्हणाले…
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर

“मी अजित पवारांचा पुतण्या आहे. दादांबद्दल आदर आहे का? असं तुम्ही मला विचारलं तर व्यक्तिगत स्तरावर काका म्हणून मला त्यांचा आदर आहेच. पण त्यांनी आज जी राजकीय विचारसरणी निवडली आहे किंवा ते ज्या भाजपाच्या प्रतिगामी विचारसरणीबरोबर गेले आहेत. तो विचार मला आवडत नाही. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून संघर्ष नक्कीच होणार आहे”, असंही रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा- “मी त्यांना अटकेपासून वाचवलं”, छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर

“वय झालंय, कुठेतरी थांबायला पाहिजे”, अजित पवारांनी शरद पवारांना उद्देशून केलेल्या विधानाबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांच्या वक्तव्याकडे मी कसा बघतो? हे बघण्यापेक्षा प्रेक्षकांनी त्याला कसा प्रतिसाद दिला ते बघा. पण पवार म्हणून मला ती गोष्ट आवडली नाही. १०० टक्के आवडली नाही. स्वत: अजित पवारांनाही ते वक्तव्य आवडलं नसावं. पण त्यांच्या आधी भाषण करणाऱ्या लोकांनी मन मोकळं झालं पाहिजे, अशाप्रकारे भाषण केलं. त्या वातावरणात कधी कधी स्वत:वरचं नियंत्रण जाऊ शकतं.”

हेही वाचा- मनातील मुख्यमंत्री कोण? अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतलं एकाच नेत्याचं नाव, म्हणाले…

“राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं. पण आपलं आपल्या भावनांवर आणि शब्दांवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे. पण त्यादिवशी वातावरणच असं असावं की, अनेकांचे तोल सुटले. बीडमध्येही एका व्यक्तीचा (छगन भुजबळ) दुसऱ्यांदा तोल सुटला, मग लोकांनीच त्यांना शांत केलं,” असंही रोहित पवार म्हणाले.