राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यापांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही सर्व त्यांच्या विधानाचा निषेध करतो. राज्यपालांची वैचारिक पातळी काय, असा प्रश्न पूर्वी पडत होता. मात्र, या विधानानंतर आता नक्की झालं आहे, की त्यांची कोणतीही वैचारीक पातळी नाही, असे ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – “…म्हणून राज्यपालांनी शिवरायांचा उल्लेख केला”, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“राज्यापालांना वैचारीक पातळी नाही”
“राज्यपालांना कोणताही इतिहास माहिती नाही. राज्यपाल मनात येईल तसं बोलत असतात. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही सर्व त्यांच्या विधानाचा निषेध करतो. राज्यपालांची वैचारीक पातळी काय, असा प्रश्न पूर्वी पडत होता. मात्र, या विधानानंतर आता नक्की झालं आहे, की त्यांची कोणतीही वैचारिक पातळी नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
“राज्यपालांना महाराष्ट्रातून कसं काढता येईल, याकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही त्यांच्या विधानाचा निषेध करतो. दोन दिवसांपूर्वी जे लोकं सावरकरांच्याबाबतीत आंदोलन करत होते. ते आज शांत का आहे. तसेच त्रिपाठी नावाचे भाजपाचे प्रवक्ते त्यांनीही शिवरायांबाबत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विधान केलं आहे” , असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “आता भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला जोडे मारणार की राज्यपालांना?” ; संजय राऊतांचा संतप्त सवाल!
“शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी जे कार्य केलं आहे, ते कुठेतरी लोकांना टोचत आहे. त्यामुळे यांच्या जागी दुसऱ्या विचारांना मोठं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? याचा विचार करणं गरजेचं आहे. राज्यपालांच्या विधानावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन, या गोष्टींचा विरोध करणं अत्यंत महत्त्वाचे आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.