ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही भास्कर जाधवांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. या हल्ल्याचे उत्तर जनतात निवडणुकीतून देईल, असे ते म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ठाकरे गटाला आणखी एक धक्का? दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? म्हणाल्या “लवकरच माझा…”

“भास्कर जाधव या सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यामुळे जर त्यांच्या घरावर हल्ला होत असेल, तर ते योग्य नाही. कोणीतरी एक आमदार येतो, हवेत गोळ्या घालतो, कोणी सरकार विरोधात बोलत असेल तर त्यांच्या घरावर गुंड हल्ले करतात, असे प्रकार आपण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही बघितले नाहीत, हे आज बघावं लागते आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याचे उत्तर लोक निवडणुकीच्या माध्यमातून देतील”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

हेही वाचा – ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; शरद पवारांसमोर भाषण करताना मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

दरम्यान, रोहित पवार यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ”शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील लक्ष्य असू शकतं” असे विधान केले होते. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “आज राज्यात आपल्याला फोडाफोडीचं राजकारण बघावं लागतं आहे. हे राजकारण सामान्य जनतेला आवडत नाही. एक मोठा पक्ष शिवसेना फुटताना आपण बघितला आहे. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष कोणता, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे विरोधक आता राष्ट्रवादीकडे बघतील अस मला म्हणायचं होतं”, असे ते म्हणाले.