काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा लिहून दिला होता, अशी टीका केली होती. राहुल गांधींच्या या टीकेनंतर राज्यात चांगलाच वाद पेटला होता. स्वातंत्रवीर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनीही प्रत्युत्तर देत राहुल गांधीना अटक करण्याची मागणी केली होती. तसेच नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली, असे ते म्हणाले होते. दरम्यान, रणजीत सावरकरांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – “नेहरूंनी एका महिलेसाठी भारताची फाळणी केली आणि १२ वर्षे…”, सावरकरांच्या नातवाचे गंभीर आरोप

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन

काय म्हणाले रोहित पवार?

”रणजीत सावकरांना इतिहास किती माहिती आहे, हे मला माहिली नाही. मात्र, असं कुठं आणि कोणी लिहून ठेवलं आहे. मुळात भाजपाचे लोकं कांदबरी लिहिणाऱ्यांवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे नेहरुंबद्दल जे काही लिहिल्या गेलं आहे, त्यावरून सावकरांनी हे विधान केलं असावं, याचे पुरावे आता त्यांनी सादर करावे. पुरावे न दाखवता केवळ तुम्ही भाषणं करणार असाल, तर त्यात काही कर्तुत्व नाही. त्यामुळे त्यांनी पुरावे दिले, तरच त्यावर चर्चा करता येईल”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

हेही वाचा – “सतत सावरकरांचं पत्र दाखवतायत त्यांच्यासाठी…” शरद पोंक्षेंची नव्या वादात उडी

दरम्यान, राहुल गांधींनी विदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत जी स्वातंत्रवीर सावकरांची पत्र दाखवली होती, संदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ”राहुल गांधी हे त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतून सत्य मांडतात. शेतकऱ्यांची अडचण, संविधानाला तडा जातो आहे, या मुद्द्यांवर ते बोलत असतात. राहुल गांधींनी सावकरांबाबत जे पत्र दाखवलं, ते सत्य आहे की नाही, ते वाचल्याशिवाय कळणार नाही. जसा शाहू, फुले, आंबेडकरांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे, तसा सावरकरांचा इतिहास अजून माहिती नाही, तो समजून घ्यावा लागेल. त्यानंतरच पत्रात काय लिहिलं आहे, हे कळेल”, असेही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते रणजीत सावरकर?

राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी गंभीर आरोप केले होते. “पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षे भारताची सर्व गुप्त माहिती त्यांनी ब्रिटिशांना दिली. माझी मागणी आहे की, नेहरू-एडवीना पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि ते सर्व जाहीर करावं. त्यानंतरच जनतेला कळेल की, ज्यांना आपण ज्यांना चाचा नेहरू म्हणतो, त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली.” असे ते म्हणाले होते.

Story img Loader