उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आमने-सामने आले आहेत. “मी चूक केली असती, तर अजित पवारांबरोबर भाजपासोबत गेलो असतो,” असं विधान बारामती अ‍ॅग्रोवर ईडीनं टाकलेल्या धाडीवर रोहित पवारांनी केलं. यावर “बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं,” असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना लक्ष्य केलं होतं. आता रोहित पवारांनी ‘एक्स’ अकाउंटवरून अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या बारामती आणि पुणे कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) शुक्रवारी छापे टाकले. यावरून रोहित पवार यांनी भाजपा आणि अजित पवार गटावर हल्लाबोल केला. “सत्तेतील मोठ्यानं आवाजात बोलणाऱ्या नेत्यांना एवढंच सांगणं आहे की, मी विदेशात होतो. मी चूक केली असती, तर भारतात आलोच नसतो. दुसरं की खरी चूक केली असती, तर अजित पवारांबरोबर भाजपासोबत गेलो असतो. मात्र, आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांना सहकार्य करत राहू,” असं रोहित पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, “त्यांनी…”

“प्रश्नाला उत्तर द्यावीत, एवढा मोठा झाला नाही”

रोहित पवारांच्या विधानाबद्दल पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं अजित पवारांना विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले, “बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यावीत, एवढा मोठा झाला नाही. माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते उत्तर देतील.”

हेही वाचा : “शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार दिल्लीतून…”, संजय राऊत यांचे मोठे विधान

“बच्चा है पर मन का सच्चा है!”

यावर रोहित पवार यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ‘दो कलियाँ’ या हिंदी चित्रपटातील व्हिडीओ ट्वीट करत अजित पवारांना टोला लगावला आहे. “बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर…”, अशा गाण्याच्या पंगती लिहित रोहित पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar reply ajit pawar over baccha comment baramati agro ed raid ssa