कर्जत-जामखेडमधील एमआयडीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राम शिंदे आणि भाजपाचे आमदार राम शिंदे हे समोर-समोर आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, ‘मग मी काय करू’ असं उत्तर दिलं आहे. तसेच, ‘राम शिंदे सांगतील, त्या पद्धतीनं कर्जत एमआयडीसीचा प्रश्न सुटेल,’ असं अजित पवारांनी म्हटलं. यावर आता रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

रोहित पवार म्हणाले, “राम शिंदे सांगतील, तसं व्हावं. पण, हजार एकरापेक्षा कमी परिसरात एमआयडीसी नको. कर्जतमध्ये बऱ्याच ठिकाणी माळढोक पक्षाचा आणि जंगलाचा प्रश्न आहे. आम्ही निवडलेल्या जागी मोठ्या कंपन्या येऊ शकतात. मात्र, ही जागा बदलली, तर फक्त गोडाऊनच होऊ शकतात. त्यामुळे जास्ती लोकांना नोकरी मिळू शकणार नाही.”

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!
Sharad Pawar on Uday Samant
Sharad Pawar: पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, “मी वाट बघतोय…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान

“…तर आम्ही शांत बसणार नाही”

“आम्ही अभ्यास करून घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्याबाबत अजित पवार लक्ष घालतील. पण, निर्णय चुकला, तर आम्ही शांत बसणार नाही,” अशा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

“ललित पाटील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी”

ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न विचारल्यावर रोहित पवारांनी म्हटलं, “ललित पाटीलने सांगितलं होतं की ‘माझ्याकडे काही नेत्यांची नावे आहेत.’ अद्याप ही नावे पुढे आली नाहीत. हा विषय संवेदनशील आहे. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे.”

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“राम शिंदे सांगतील, त्या पद्धतीनं कर्जत एमआयडीची प्रश्न सुटेल. नियमाच्या चौकटीत बसून तो मुद्दा सोडवावा लागेल. तिथं तरूण-तरूणींना रोजगार कसा मिळेल, याचा विचार केला पाहिजे. त्याठिकाणी गुंतवणूक कशी होईल, यासाठी महायुतीचा प्रयत्न चालला आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Story img Loader