राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेपाठोपाठ या पक्षातही दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीतील बरेच आमदार अजित पवारांबरोबर गेले असून शरद पवार गटाची ताकद कमी झाली आहे. पक्ष फूटल्यापासून शरद पवार यांच्या गटातले आमदार रोहित पवार सत्ताधारी भाजपा आणि अजित पवार गटावर टीका करत आहेत. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचं कुटुंब, शरद पवार यांचं कुटुंब फोडलं असून आता ते मजा बघत बसले आहेत असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित पवार म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीने योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाटी शिवसेना काढली आणि ती शिवसेना भाजपाने फोडली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी फोडली. त्यामुळे उत्तर प्रत्युत्तर आम्ही आमच्यातच देतोय आणि भाजपा बाजूला राहतेय.”रोहित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, रोहित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की, तुम्हाला बारामती विधानसभेची उमेदवारी दिली तर तुम्ही अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढाल का? त्यावर रोहित पवार म्हणाले, मला उमेदवारी दिली तरी मी ती निवडणूक लढणार नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही बारामती विधानसभेची जागा लढवणार नाही. मी हे ही सांगतो की बारामतीत शरद पवारांच्या दूरदृष्टीतून आणि अजित पवार यांनी केलेल्या कामांमुळे दादांनाच तिथं मतदान होणार आहे.

हे ही वाचा >> “गोपीनाथ मुंडेंचं कुटुंब फोडलंत, धनंजयला तुम्ही…”, छगन भुजबळांचा शरद पवारांवर आरोप

रोहित पवार म्हणाले, राज्यातले लोक नाराज आहेत. बारामतीसुद्धा नाराज आहे. परंतु जेव्हा विधानसभेचा विषय येईल तेव्हा बारामतीतून अजित पवार यांनाच मतदान होईल, असा विश्वास माझ्यासारख्यालासुद्धा वाटतो.