राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीसाठी आक्रमक होऊ लागले आहेत. जरांगे-पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच छगन भुजबळ हे ओबीसी समाजाला मराठा समाजाविरोधात भडकावत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. भुजबळ दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यासह अनेक मराठा नेत्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला, बीडमधील झालेल्या हिंसाचारास मनोज जरांगे पाटील जबाबदार असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसी एल्गार सभेचं आयोजन केलं आहे. बीडमधील दगडफेक आणि जाळपोळीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत भुजबळ यांनी ओबीसी समुदायाला एल्गार सभेला येण्याचं आवाहन केलं आहे भुजबळ यांनी म्हटलं आहे की, मी येतोय, तुम्हीही नक्की या! ज्या बीड जिल्ह्यात ओबीसींवर जातीय द्वेषातून अमानुष हल्ले झाले, त्याच बीडमध्ये आपण १३ जानेवारी रोजी भव्य ओबीसी एल्गार मेळावा घेत आहोत. ओबीसीतील ३७५ समाजांमधील बांधवांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देऊया!

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Pm Narendra Modi Speech in Rajayasabha
Pm Narendra Modi : “काँग्रेससाठी गाणं न म्हटल्याने किशोर कुमार यांना आकाशवाणीचे दरवाजे बंद” झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान

छगन भुजबळ यांच्या या कृतीवर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (१२ जानेवारी) महाराष्ट्रात आले होते. नाशिकमध्ये त्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्याबरोबर छगन भुजबळही तिथे हजर होते. देशातला इतका मोठा नेता आपल्याकडे आल्यावर तुम्ही आपले विषय त्यांच्यापुढे मांडायला हवे होते. केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी ईडब्ल्यूएस कोटा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा विषयदेखील पंतप्रधानांपुढे मांडायला हवा होता.

आमदार रोहित पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींसारखा मोठा नेता आपल्याकडे आलेला असताना आपण आरक्षणावरून उगाच व्हिडीओ ट्वीट करत बसण्यापेक्षा थेट पंतप्रधान मोदी यांना सांगितलं असतं, मराठा, धनगर आणि इतर समाजांच्या आरक्षणाचा विषय त्यांच्या कानावर घालायला हवा होता. घटनात्मक दुरुस्ती करून जसा तुम्ही EWS कोटा संसदेत पारित केला. त्याचप्रमाणे आमच्या राज्यातल्या युवांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी विनंती करायला हवी होती.

हे ही वाचा >> माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार? सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत…”

मंत्री छगन भुजबळावर संताप व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, जिथे लोकांच्या हितासाठी बोलायचं तिथे तुम्ही शांत बसता आणि समाजांमध्ये तेढ निर्माण करायची असेल तर घसा कोरडा होईपर्यंत बोलता आणि ट्वीट करता. त्यामुळे मला असं वाटतं की, त्यांनी उगाच राजकारण करू नये. पंतप्रधान आल्यावर तिथे बोलायची तुमची हिंमत होत नाही आणि इथे येऊन तुम्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहात. असं करून तुम्ही राज्यातल्या मुख्य विषयांना बगल देताय. राज्यात बेरोजगारीचा विषय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ते तुम्ही बाजूला ठेवत आहात. त्यामुळे तुम्ही हे राजकारण थांबवा आणि मुद्द्याचं बोला, असं आमचं मत आहे.

Story img Loader