राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीसाठी आक्रमक होऊ लागले आहेत. जरांगे-पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच छगन भुजबळ हे ओबीसी समाजाला मराठा समाजाविरोधात भडकावत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. भुजबळ दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यासह अनेक मराठा नेत्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला, बीडमधील झालेल्या हिंसाचारास मनोज जरांगे पाटील जबाबदार असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा