गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक मराठी रॅप धुमाकूळ घालतंय. “५० खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन” हे रॅप काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या रॅपमुळे कलाकार राम मुंगासे स्टार झाला आहे पण दुसऱ्याच दिवशी त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मुंगासेला आता अंबरनाथ पोलिसांच्या हाती सोपवतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम मुंगासे या कलाकाराच्या अटकेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, “आपल्या रॅप साँगमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला केवळ ५० खोके या शब्दामुळे अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का?”

“ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा कारभार”

रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, “शिवीगाळ करण्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली तेव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे.”

हे ही वाचा >> “मातोश्रीचा एफएसआय क्लिअर करणारे फडणवीस आता फडतूस कसे?” मनसे नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

दोन दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मुंगासे याचं रॅप सोशल मीडियावर शेअर करून त्याचं कौतुक केलं होतं. तसेच त्यावेळी त्यांनी मुंगासे याच्यावर पोलीस कारवाई करतील, अशी भीतीदेखील व्यक्त केली होती.