राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै २०२३ या दिवशी फूट पडली आहे. कारण याच दिवशी अजित पवार यांनी आपल्या पक्षातल्या काही लोकांना बरोबर घेऊन सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. या दोन गटांमधला संघर्ष जुलै २०२३ या महिन्यात समोर आला होता. तसंच रोहित पवार यांची संघर्ष यात्राही चर्चेत होती. अशात आता पुतणे रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. भाजपाचे हैदराबादचे आमदार टी. राजा यांना कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. टी. राजा त्यांच्या प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणामुळे वातावरण दूषित होऊ शकतं असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवार यांना सोडून गेल्याचा संदर्भ देत अजित पवारांना पुतणे रोहित पवार यांनी भावनिक साद घातली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा