ठाण्यातल्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाचे पडसाद चांगलेच उमटताना दिसत आहेत. रोशनी शिंदे यांची आज रूग्णालयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे पत्रकारांवर संतापले आणि त्यांनी संतप्त सवाल महाराष्ट्र सरकारला केला आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी रोशनी शिंदेंबाबत ?

रोशनी शिंदे या गर्भवती नव्हत्या असा रिपोर्ट आला आहे. असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता उद्धव ठाकरे चांगलेच संतापले, “रोशनी शिंदे या गर्भवती नव्हत्या असा रिपोर्ट आला आहे. पण मग पोटात लाथा मारण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? रोशनी हात जोडून त्यांना सांगत होती की मला पोटात मारू नका तरीही त्यांना पोटात मारण्यात आलं. गयावया करणाऱ्या महिलेला अशा प्रकारे मारहाण करणाऱ्या लोकांना या ठाण्यात काय राज्यातच राहण्याचा अधिकार नाही. यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं आता या प्रकरणी फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही””

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!

एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जे काही प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत ते पाहिले तर यांना मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा गुंडमंत्री म्हटलं पाहिजे. गुंडमंत्री मी म्हणत नाही. मात्र गुंडगिरीचाच हा सगळा प्रकार आहे. ही गुंडगिरी महाराष्ट्रात कशी काय चालली आहे? आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यावेळी गुंड मंत्री असं नवं पद निर्माण करा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून लगावला आहे. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, पोलीस आयुक्तांना निलंबित करा अशाही मागण्या उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक अशी टिपण्णी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच हे सांगितलं आहे त्याची प्रचिती ठाण्यात आली आहे. मी गँग शब्द वापरला नव्हता. पण आता ठाण्यात महिला गुंडगिरी करू लागल्या आहेत. त्यामुळे देशाचं, राज्याचं आणि ठाण्याचं काय होणार? हा ठाणेकरांपुढचा प्रश्न आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. रोशनी शिंदे असं या मारहाण झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणात पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही.