Sachin Kharat on Ramdas Kadam: शिवसेनेत आत्तापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या पक्षफुटीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. आमदारांसोबत आता शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार-खासदारांनी पक्षावर, उद्धव ठाकरेंवर आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता रामदास कदमांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया उमठत आहे. आयपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच अजित पवारांविषयी तोंड सांभाळून बोला असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे.

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर

शिवसेनेनं भाजपाला महाराष्ट्रात आणलं – खरात

त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “अहो, रामदास कदमजी, आपण ज्या शिवसेनेत होता, त्याच शिवसेनेचा व्यवस्थित गृहपाठ करा. भारतीय जनता पार्टीला शिवसेनेनं महाराष्ट्रात आणलं. त्यानंतर २०१४ मध्ये, महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन होताना तुमची काय अवस्था होती? हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मंत्रिमंडळात गेल्यानंतर भाजपानं तुम्हाला कशी वागणूक दिली? हेही तुम्हाला माहीत आहे. त्यामुळेच तुम्ही मीडियात रोज सांगत होतात की, तुमच्या खिशामध्ये राजीनामे आहेत.”

हेही वाचा- “अजित पवारांचा एक कलमी कार्यक्रम होता, सकाळी ७ वाजता…”, शिवसेनेतून हकालपट्टीनंतर रामदास कदम यांचं टीकास्त्र!

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं, पण तुम्ही त्यांना सोडून पळ काढला- सचिन खरात

“तुमचा सतत होणारा अपमान उद्धव ठाकरेंना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे आता तुम्हीच आत्मपरीक्षण करा, ज्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन तुम्ही जगता, ते एका सभेत म्हणाले होते, आता माझ्या उद्धवला सांभाळा. पण तुम्ही त्यांना सांभाळलंच नाही. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं. पण तुम्ही त्याच उद्धव ठाकरेंना सोडून पळ काढला. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे” असंही खरात म्हणाले.

हेही वाचा- “शरद पवारांनी शेवटी डाव साधला, आमची शिवसेना…”, पक्षफुटीवर बोलताना रामदास कदम यांचा गंभीर आरोप!

अजित पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन खरात पुढे म्हणाले, “अहो रामदास कदम, अजितदादांविषयी बोलताना जरा तोंड सांभाळून बोला. कारण तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो लावून निवडून आलात. आता खरंच तुमच्यात हिंमत असेल, तर राजीनामा द्या. मग शिवसेना कुणी संपवली? हे जनता तुम्हाला नक्कीच सांगेल.”