शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान सर्वपक्षीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया उमटत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केलं आहे.

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे यांची अडचण मला माहिती, संजय राऊत यांचा गंभीर आरोप; वाचा प्रत्येक अपडेट…

Kalyan East candidates, Kalyan West candidates,
कल्याण पूर्व, पश्चिमेतील ठाकरे गटाचे उमेदवार ठरले, शिंदे शिवसेनेचे ठरेना
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : “डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला, पण मी त्यांना म्हटलं आधी…”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
Who Left BJP Due to Ajit Pawar?
Laxman Dhoble : “अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडतो आहे”, माजी मंत्र्यांची घोषणा! आता हाती घेणार तुतारी
Eknath Shinde and shilpa bodkhe resign
Shilpa Bodkhe : आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, आता शिंदेंच्या शिवसेनेलाही रामराम; ‘या’ महिला नेत्याची आठ महिन्यांत शिवसेनेला सोडचिठ्ठी!

“एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही,” असं रामदास आठवले यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे बंड पुकारण्याच्या तयारीत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ समोर; शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

शिवसैनिक आक्रमक

शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड पुकारण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवसेना भवनाबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शिवसैनिकांना जमण्याचे आदेश दिल्याची माहिती असून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेंचं मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी पोहोचले आहेत. यादरम्यान वर्षा बंगल्यावर आमदार पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

शिवसैनिकांची गर्दी होत असल्याने शिवसेना भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसैनिकांकडून यावेळी घोषणाबाजी केली जात असून आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत असं सांगताना भावूक होत आहेत. तसंच ‘आमच्या सोबत नसलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी बांगड्या घाला,’ असं आवाहन महिला शिवसैनिक करत आहेत.

एकनाथ शिंदेंचं ट्वीट

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.

सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील नेत्यांच्या संपर्कात आहेत. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर काही आमदारांनी पाटील यांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान पाटील यांनी यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं असून ‘मी गांधीनगरमध्ये असून काही आमदार सूरतमध्ये आल्याची माहिती मिळाली,’ असल्याचं म्हटलं आहे.