वाई: सातारा पुणे महामार्गावर थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधून तब्बल २२ लाख रुपये लंपास करण्यात आले. बोपेगाव (ता वाई)गावच्या हद्दीत असलेल्या कोहिनूर हॉटेल येथे हि गाडी थांबली होती.यावेळी अज्ञाताने  एका प्रवाशाची २२ लाखाची रक्कम लाबवली.याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “त्या चिंधीचोराने माझ्याशी…”, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला

मंगळवार दि. २६ रोजी  सकाळी ७:३० ते ८:१० वा सुमारास वाई तालुक्यातील बोपेगाव गावच्या हद्दीत साताऱ्याकडून  पुण्याकडे जाणारी खाजगी बस कोहिनूर हॉटेलच्या आवारात व्ही आर एल ट्रॅव्हल्स (केए २५ डी ४८६३ )थांबली होती.नरेंद्र प्रल्हादसिंह गिरासे ( फिर्यादी ) वय ४२ हे बाथरूमला गेले होते ते बाथरूमला जायच्या आधी त्यांच्याजवळ असणाऱ्या काळ्या रंगाची बॅग त्यांनी ट्रॅव्हल्स मध्येच ठेवली. लगेच परत ट्रॅव्हल्स जवळ आले. तेव्हा त्यांच्याजवळ असणाऱ्या बॅग व त्यामध्ये ठेवलेले सुवर्णा बिल्डकॉन कंपनीच्या मशीनरी विक्रीचे असलेले २२ लाख रुपयांची रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यानी मुद्दाम लबाडीने चोरून नेले. म्हणून नरेंद्र गिरासे यांनी त्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात भुईंज पोलीस स्टेशन रविवार (दि १) रोजी फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदतशनाखाली अधिक तपास पोलिस  उपनिरीक्षक व्ही. एस. भंडारे करत आहेत.