भाजपच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने आयोजित केलेली चिंतन बठक पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या उपस्थितीतच पार पडली. नरसी येथील भाजपच्या या चिंतन बठकीविषयी निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजप उमेदवारांचा पराभव झाला, त्या मतदारसंघात पक्षाने चिंतन बठकीच्या माध्यमातून पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाचे संघटनमंत्री रवि भुसारी यांनी जिल्हय़ाची जबाबदारी प्रभारी संघटनमंत्री संजय कौडगे यांच्यावर सोपवली आहे. कौडगे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड दक्षिण-उत्तर, कंधार-लोहा, नायगाव, देगलूर, भोकर, किनवट, हदगाव या मतदारसंघांत चिंतन बठकीचे आयोजन केले होते. बठकीस पक्षाचे पराभूत उमेदवार व प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. पराभूत उमेदवार व पदाधिकाऱ्यांत समन्वय नसल्याची बाब या बठकीतून स्पष्ट झाली.
नायगाव मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण व राष्ट्रवादीचे बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्याविरुद्ध टक्कर देऊन दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे भाजप उमेदवार राजेश पवार नरसी येथील चिंतन बठकीस गरहजर होते. प्रभारी पक्षसंघटनमंत्री कौडगे यांनी बठकीची साधी कल्पनाही पराभूत उमेदवारांना दिली नसल्याची माहिती उघड झाली. भाजप सरचिटणीस श्रावण भिलवंडे व समर्थकांनी निवडणूक काळात पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप पराभूत उमेदवार पवार यांनी लेखी स्वरूपात पक्षश्रेष्ठींकडे केल्यानंतर ही चिंतन बठक आयोजित केली होती.
कौडगे यांनी पराभूत उमेदवार पवार यांनी बठक आयोजनाची जबाबदारी विरोधी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या भिलवंडे यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकत्रे व पदाधिकाऱ्यांनी बठकीवर अघोषित बहिष्कार टाकला. बठकीला बहुतांश भिलवंडे समर्थकांनीच हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. पराभूत उमेदवारांना चिंतनाची गरज असताना त्यांना बठकीचे रीतसर निमंत्रण देण्यात आले नाही. उलट ज्या मंडळीमुळे भाजपचा पराभव झाला, त्यांची बठक घेऊन उमेदवाराने आपणास विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला. नरसी गावची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे नेते म्हणून भिलवंडे यांची ओळख आहे. नरसी जि.प. सर्कल व ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असले, तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत या पक्षाची पीछेहाट झाली. लोकसभा निवडणुकीत डी. बी. पाटील यांना नरसी गावात नगण्य मतदान झाले. विधानसभेतही पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची, काँग्रेसला पहिल्या व राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा